अब्बास शेख
पुणे : दौंड चे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्या जावयाचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपी अमित बाळासाहेब कांबळे आणि सागर माने या दोघांना अटक केली आहे.
दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्या पुण्यात असलेल्या मुलीचे पती अलीम इस्माईल शेख (वय- ४५) यांची हत्या झाली असून या हत्येप्रकरणी आरोपी अमित बाळासाहेब कांबळे आणि सागर माने या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड येथील दापोडीत सायंकाळी पाच वाजण्याच्या आसपास घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोडी येथील गणेश नगर भागात अलिम यांनी पार्क केलेल्या रिक्षात आरोपी अमित हा त्याच्या प्रेयसीसोबत अश्लील चाळे करत होता. हे कृत्य पाहून रिक्षाचे अलिम यांनी त्यांना येथे आमच्या गाडीत हे चाळे करु नका म्हणून हटकले. या गोष्टीचा अश्लील कृत्य करणाऱ्या अमितला राग आला या दोघांमध्ये यावरून वाद झाला. क यावेळी अमित याने त्याच्या मित्र सागर यास बोलवून घेतले आणि दोघांनी दगड, सिमेंटच्या गट्टूने अलिम यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अलिम यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते ठार झाले. या घटनेमुळे दापोडी आणि दौंड शहरात मोठी खळबळ माजली आहे.
दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांचे अलिम हे जावई होते. बादशहा शेख यांची द्वितीय कन्या अलिम यांची पत्नी असून त्यांना एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे.