शिरूर : पतीने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने पत्नीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना राक्षेवाडी, रांजनगाव सांडस येथे घडली आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी पतीचा खून केल्याबद्दल पत्नीवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२/०३/२०२३ रोजी रात्री ८:३० ते दि. १३/०३/२०२३ रोजी सकाळी ०६:०० वा. चे दरम्यान राक्षेवाडी, रांजणगाव सांडस (ता.शिरूर, जि.पुणे) येथील दत्तात्रय लक्ष्मण शिंदे यांचे ऊसाचे गु-हाळाजवळील पत्राचे खोलीमध्ये विलास उर्फ विकास याने दारू पिऊन व चारित्र्याचे संशयावरून त्याची पत्नी सविता विलास चव्हाण हिस मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून सविता चव्हाण (वय ३०) हिने तीचा पती विलास उर्फ विकास गलचंद चव्हाण (वय ३२ रा.मूळ मोहारडा तांडा जि.औरंगाबाद) याचा आपल्या हाताने गळा दाबून खून केला.
याची माहिती मृत विलास चा भाऊ गोविंद चव्हाण याने शिरूर पोलिसांना देत भावाची पत्नी सविता चव्हाण हिच्या विरुद्ध भावाचा खून केल्याची फिर्याद शिरूर पोलिस ठाण्यात दिली. त्याच्या फिर्यादीवरून सविता चव्हाण हिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.