दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथे असणाऱ्या लालचंदनगर या गजबजलेल्या ठिकाणी मोठी हाणामारी झाली आहे. यात एकाला बॅट, वायर आणि कोयत्याने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
यवत पोलिसांकडून उशीरा मिळालेल्या माहितीनुसार दि.13 फेब्रुवारी रोजी शरद बाळासाहेब गायकवाड (वय 33 वर्षे धंदा शेती रा. धुमळीचा मळा, केडगाव ता. दौंड) याला पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून
आरोपी 1) मयुर विजय गायकवाड (वय 25) 2) रोहीत विजय गायकवाड (वय 28) व 3) नवनाथ पंढरीनाथ गायकवाड (वय 30 सर्व रा. धुमळीचा मळा केडगाव ता दौंड जि पुणे) यांनी गोविंद स्विटहोमच्या पाठीमागे असणाऱ्या लालचंदनगर येथे त्यांच्या हातातील लोखंडी कोयता, लाकडी बॅट व लोखंडी वायरने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
यातील फिर्यादी आणि आरोपिंमध्ये जमिनीच्या कारणावरून जुना वाद असल्याची माहिती समोर येत आहे. या अगोदरहि यातील फिर्यादी आणि आरोपिंमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या असून दोघांनी एकदुसऱ्याच्या विरोधात परस्पर तक्रारी दिल्या आहेत. घटनेचा अधिक तपास सपोनि लोखंडे करीत आहेत.