पुणे : लोणीकाळभोर पोलीस स्टेशन ने दाखवीलेल्या सतर्कतेमुळे, सुपारी देऊन कुविख्यात टोळीकडून साक्षीदारांचे होणारे खुन आणि त्याचा कट उधळला गेला आहे असून यात दोघांचा जिव वाचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये सन २०२१ मध्ये संतोष जगताप व त्याचा अंगरक्षक यांचा भर रस्त्यामध्ये गोळीबार करुन खून करण्यात आला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोरील गोळीबारामध्ये तीघांचा जिव गेला होता. सदर घटनेचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं. ५७१/२०२१ भा.दं.वि.क.
३०२,३०७, १२०- ब, ३४ भा. ह. का. क. ३ (२५), ५ (२७) क्रिमीनल लॉ अॅमेन्टमेंट ॲक्ट क. ३ व ७ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(i), ३ (२), ३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील अनेक साक्षीदारांपैकी महत्वाचे साक्षीदारांना संपविण्याचा कट संतोष जगताप खुन खटल्यातील मुख्य आरोपींनी शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आल्यानंतर त्यांचे जवळचे मित्रांना (रेकॉर्डवरील गुन्हेगारांना) काही लाख रुपयांची सुपारी देऊन रचला होता.
सदरची गुप्त माहिती लोणीकाळभोर पोलिसांना मिळाली होती. त्यावर मागील काही दिवसांपासुन सदर माहितीच्या अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस आरोपिंचा शोध घेत होते.
दि. २८/०१/२०२३ रोजी लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे पो. शि. निखील पवार यांना मिळालेल्या खात्रीशिर बातमीवरुन लोणीकाळभोर पोलीस स्टेशनने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली दत्तवाडी
रोड, सरकारी दवाखान्याजवळ ऊरुळीकांचन, पुणे याठिकाणी सापळा रचुन अग्निशस्त्र व तिक्ष्ण हत्यारासह दोन आरोपींना शिताफीने पकडले. सदर सापळा कारवाई दरम्यान आरोपींचे अंगझडतीमध्ये त्यांचेकडुन एक
गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, एक धारदार चाकु अशी घातक हत्यारे जप्त करणेत आली आहेत. सदर प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं. ९२ / २०२३ भा. हत्यार कायदा कलम ३ (२५), म. पो. का. क. ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून त्यामध्ये आजपर्यंत आरोपी १ ) आशिष अनिल
वरगडे (वय २२ वर्षे रा. आश्रमरोड, उरुळीकांचन, पुणे) २) उध्दव राजाराम मिसाळ (वय ४५ वर्षे रा. दत्तवाडी,
उरुळीकांचन, पुणे) ३) सुरज सतिष जगताप (रा. गणेशवाडी, वरवंड, पुणे) ४) किशोर ऊर्फ शिवा छबु साळुंके (रा. बोरीपार्धी, केडगाव, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. नमुद आरोपींची मा. न्यायालयाकडुन ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेणेत आली आहे.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये वरिल हकिकत निष्पन्न झाली आहे. गुन्हयाचे तपासामध्ये यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे. सन २०१५ मध्ये कुविख्यात गुंड व वाळुमाफिया आप्पा लोंढे याचा खुन आरोपी १) संतोष भिमराव शिंदे (रा. शिंदवणे ता. हवेली जि. पुणे) २) निलेश खंडु सोलनकर (रा. डाळींब दत्तवाडी, ता. हवेली जि. पुणे) ३) राजेंद्र विजय गायकवाड (रा. शिंदवणे) ४) आकाश सुनिल महाडीक (रा. उरुळीकांचन ५) विष्णु यशवंत जाधव रा. माळवाडी) ६) नागेश लक्ष्मण झाडकर (रा. उरुळीकांचन) यांनी केला होता. त्यांना मोका केसमध्ये शिक्षा लागल्याने ते अद्याप जेलमध्ये आहेत.
दि. २२/१०/२०२१ रोजी संतोष जगताप याचे मर्डर केस मधील आरोपी विष्णु यशवंत जाधव याने कट रचुन संतोष जगताप याचा खुन केला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोर झालेल्या गोळीबारामध्ये संतोष जगताप व इतर दोघांचा खुन झाला होता. सदर घटनेमुळे त्यावेळी संपुर्ण पुणे शहर हादरले होते.
सध्या संतोष जगताप याचे खुन खटल्याची सुनावणी सुरु होत आहे. अशावेळी सदर केसमधील मुख्य साक्षीदारांच्या साक्षीवर यातील सर्व आरोपींना फाशी किंवा जन्मठेप अशी शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे ही
गोष्ट आरोपींना ज्ञात असल्याने त्यांनी मुख्य साक्षीदारांना संपवुन टाकण्याचा कट रचला होता.
त्याप्रमाणे त्यांनी कोर्ट पेशीचेवेळी मोठी रक्कम देण्याचे आश्वासन देवुन अटक आरोपींना त्यांचे बाहेर असलेल्या हस्तकांमार्फत अग्निशस्त्र (पिस्तूल) पुरवले असल्याची बातमी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एल. चव्हाण व त्यांचे टीम ला मिळाली होती. त्यावर पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णीक,
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर श्री बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री सुभाष काळे,
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अमित गोरे यांचे पथकातील पो. हवा. नितीन गायकवाड, सुदर्शन बोरावके, पो.ना. अमित साळुंके, पो. ना. देवीकर, पोना नागलोत, पोना जाधव, पोशि गणेश भापकर,
पोशि विर, पोशि शिरगीरे, पोशि कुदळे, म.पो. शि. फणसे, यांनी बातमीप्रमाणे सापळा रचुन यशस्वी सापळा कारवाई केली व आरोपीतांना अटक करुन त्यांचा कट उधळुन लावला आहे. अटक आरोपींनी सदर गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण करीत आहेत.