धक्कादायक : पुण्यात एकाच कुटुंबातील ‘चौघांचे’ मृतदेह आढळले, जेवणातून विष दिल्याची प्राथमिक माहिती

पुणे : पुणे शहरातील केशवनगर (मुंढवा) येथे राहत असलेल्या थोटे कुटुंबातील चौघांचे मृतदेह शुक्रवारी रात्री त्यांच्या राहत्या घरामध्ये आढळून आले आहेत. दीपक थोटे वय (59), इंदू थोटे वय (55), तसेच त्यांचा मुलगा ऋषिकेश थोटे (वय 21) आणि त्यांची 17 वर्षांची मुलगी समीक्षा या चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत.

या सर्वांना जेवणातून विष दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून शेअर बाजारात मोठा आर्थिक फटका बसल्याने हे आत्महत्याकांड घडल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुंढवा येथील केशवनगर मध्ये काही महिन्यांपूर्वी अमरावती येथून थोटे कुटुंब येथे राहायला आले होते. थोटे कुटुंबाने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्याचे बोलले जात असून त्यातूनच त्यांना आर्थिक फटका बसल्याने त्यातील कुटुंब प्रमुखाने जेवनातून स्वतः व परिवाराला विष देऊन मारले असल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत असून शव विच्छेदणासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.