अख्तर काझी
दौंड : एका मागासवर्गीय समाजातील वीट भट्टी कामगाराची येथील तिघांनी बळजबरीने सुंता( खतना) केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बबलू मिलिंद चव्हाण(वय 28,रा. कुंभार गल्ली, दौंड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून कुमेल जब्बार कुरेशी, आसिफ शेख (रा. कुंभार गल्ली ,दौंड) व डॉक्टर (पूर्ण नाव समजू शकले नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी सदरची घटना घडली. फिर्यादी 2020 पासून दौंडमधील वीट भट्टीवर काम करतात. याआधी 2018 साली त्यांचा येथील मुस्लिम महिलेबरोबर कुर्डवाडी येथे विवाह झालेला आहे. दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी आरोपी कुमेल कुरेशी, आसिफ शेख व डॉक्टर यांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांची बळजबरीने सुंता केली. या कृत्यामुळे हिंदू धर्माचा व धार्मिक श्रद्धेचा त्यांनी अपमान केला आहे.
दौंड पोलिसांनी या आरोपीं विरोधात ॲट्रॉसिटी तसेच भा. द..वि.298,324,323,34 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटना घडल्यानंतर भीतीपोटी फिर्यादी घर सोडून गेले होते अशी माहिती ही पोलिसांनी दिली.