खा.शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी फोनकरून हि धमकी देण्यात आली आहे.

खा.शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर त्यांच्या निवास्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला असून फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालच 12 डिसेंबर रोजी खा.शरद पवार यांचा 82 वा वाढदिवस मोठ्या जल्लोशात साजरा करण्यात आला होता आणि आज त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. फोन करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यासाठी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

बातमीची पुढील अपडेट लवकरच देत आहोत…