दौंडमध्ये क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्साहात साजरी

दौंड : दौंडमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये लहुजी यंग ब्रिगेडच्या वतीने लहुजी वस्ताद यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, पो. निरीक्षक विनोद घुगे, मा. नगरसेवक बबलू कांबळे, गोविंद अग्रवाल, रुपेश बंड, अमोल जगताप, श्रीकांत थोरात, अण्णा कांबळे, सुनील शिंदे यांनी लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नितीन तूपसौंदर्य व हिरण खुडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

निखिल भोकरे ,सनी बनसोडे, दत्तू घोडे, सचिन सोनवणे, आकाश तूपसौंदर्य ,अमोल कांबळे ,दत्ता तुपसौंदर्य, करण सोनवणे, निखिल ससाणे, शुभम तूपसौंदर्य ,अभिषेक शिंदे, प्रथमेश मोरे ,विश्वास शिंदे ,बाळू तूपसौंदर्य यांचे सहकार्य लाभले.