दौंड
दि.12 रोजी सकाळी 8 वाजता एका अज्ञात इसमाला रेल्वेची धडक बसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रल्हाद सोनवणे (रा.पाटस,ता.दौंड) यांनी खबर दिली.
मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार हे आर.पी.एफ चौकीत हजर असताना त्यांना पुणे कंट्रोल रूम येथुन फोन आला की, दौड ते पुणे जाणारे रेल्वे लाईन किमी नं. २४६/८ जवळ केडगाव-बोरीपार्धी ता. दौड जि. पुणे या गावच्या हद्दीतमध्ये ५० ते ५५ वर्षाच्या इसमाला रेल्वेची ठोस बसुन तो इसम मयत झाला असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी खात्री करण्याकरीता खबर देणार हे सदर ठिकाणी गेले असता त्यांना एक अनोळखी इसम हा रेल्वे रूळ लाईनच्या साईटला असलेल्या पाण्याच्या चारीत मयत अवस्थेत पडलेला दिसला. त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता त्याची ओळख पटू शकली नाही.
त्यामुळे संबंधित लोकांनी त्यास पोस्टमार्टम करण्यासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून सदर बेवारस इसम किंवा त्याचे नातेवाईक यांचेबाबत काही एक माहीती मिळाल्यास यवत पोलीस स्टेशनला माहीती देण्याची विनंती यवत पोलिसांनी केली आहे. सदर मयताचा फोटो खालील प्रमाणे आहे. यवत पोलीस स्टेशन फोन नं. ०२११९ २७४२३३