दौंड : शहरातील भीम नगर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी याच परिसरात राहणाऱ्या तिघा युवकांविरोधात दौंड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अतिश सोनवणे, रितेश गायकवाड, स्वप्निल सोनवणे (तिघे रा. भीम नगर दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी हिला तिचा मोबाईल नंबर मागितला परंतु तिने तो न दिल्याने आरोपींनी तिला परिसरातील पडक्या खोली मध्ये जबरदस्तीने ओढत नेले. यावेळी आरोपी अतिश सोनवणे याने फिर्यादीस मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे, तू माझ्यासोबत पळून चल असे म्हणून फिर्यादीच्या अंगावरील कपडे फाडले.
तिघा आरोपींविरोधात दौंड पोलिसांनी भा. द. वि .कलम 354(ब), बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.