दौंड
दौंड तालुक्यातील वाखारी गावामध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांनी अखेर JCB फिरवून मोठी कारवाई केली आहे. याबाबत सहकारनामा वृत्त प्रसिद्ध केले होते ज्या नंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
वाखारी परीसरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु असल्याचे आणि त्यास तेथील शेतजमीन कसणारे अभय देत असल्याची बातमी सहकारनामा ने प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर यवत आणि केडगाव चे पोलीस पथक संशईत जागेंवर लक्ष ठेऊन होते. ज्या ठिकाणी गुप्तपने हे सर्व अवैध धंदे केले जात होते त्या ठिकाणी पोलिसांनी JCB ने कारवाई करत सर्व साहित्य आणि देशी दारूचे रसायन नष्ट केले आहे.
ही कारवाई यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत आणि केडगाव पोलीस स्टाफने केली आहे.