शेतकऱ्यांच्या ‘थकीत वीजबिल’ संदर्भात कुठलाही दिलासा न देणाऱ्या ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या विरोधात विधानभवन परीसरात देवेंद्र फडणवीस, आ.राहुल कुल यांची घोषणाबाजी

मुंबई : शेतकऱ्यांच्या ‘थकीत वीजबिल’ संदर्भात कुठलाही ठोस निर्णय, दिलासा न देणाऱ्या ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या विरोधात आज विधानभवन परीसरात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ.राहुल कुल यांसह भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली.

थकीत वीजबिलापोटी राज्यातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची वीज बेधडकपणे खंडित करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. अतिवृष्टी, अवर्षण आदींनी राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असतानाच ऐन उन्हाळामध्ये शेतकऱ्याची वीज खंडित केल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. शेतीपंपांची अवास्तव बिल आकारणी, लाखो रुपयांची थकबाकीची बिले देऊन सक्तीच्या वीज बिल वसुलीने बळीराजाचा अडचणीत येत आहे.

या संदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीच्या इतर विधानमंडळ सदस्यांनी आज सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली परंतु शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम थांबविण्याबाबत व शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिला संदर्भात कुठलाही ठोस उपाय, दिलासा न देणाऱ्या जुलमी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व आमदारांनी विधानभवन परिसरात निदर्शने करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.