Social Work – बकरी ईद निमित्ताने मुस्लिम अल्पसंख्यांक सांस्कृतिक भवन संस्थेच्या वतीने दौंडमध्ये वृक्षारोपण



|सहकारनामा|

दौंड : मुस्लिम धर्मीयांच्या बकरी ईद सणा निमित्ताने येथील मुस्लिम अल्पसंख्यांक सांस्कृतिक भवन संस्थेच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान यांच्या पुढाकाराने ईदगाह मैदान परिसरामध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

मा.आमदार रमेश थोरात, पोलीस निरीक्षक नारायण पवार, राष्ट्रवादी पक्षाचे ता.अध्यक्ष आप्पासो पवार, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, नगरपालिकेतील गटनेते बादशहा शेख तसेच पत्रकार मनोहर बोडखे, नरेंद्र जगताप, राजू जगदाळे व इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी 100 विविध जातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हरेष ओझा, अजित बलदोटा, प्रवीण परदेशी, तसेच नगरपालिकेतील दोन्ही गटातील नगरसेवक व मुस्लिम बांधव उपस्थित होते. ईद निमित्ताने संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले व मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

कोरोना काळात सर्वत्रच ऑक्सीजनचा तुटला जाणवला, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यामुळे झाडांचे महत्व किती मोठे आहे याची जाणीव आम्हा सर्वांनाच झाली आहे. 

यामुळेच ईदचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबविला असे सोहेल खान यावेळी म्हणाले. इस्माईल शेख, मन्नान इनामदार, मोहसिन बागवान, समीर पटेल, शाहिद कुरेशी, मोहसीन शेख, जावेद कुरेशी,  अकलाख खान, जाकीर शेख आदींनी उपक्रमाचे आयोजन केले