आपण याला पाहिलंत का! हा आहे 1 कोटी 12 लाखाच्या जबरी चोरीतील आरोपी



|सहकारनामा|

दौंड : पुणे सोलापूर हायवेवर दौंड तालुक्यातील पाटस येथे दि.3 ऑगस्ट रोजी रात्री 1:15 च्या दरम्यान एसटी बस अडवून सुमारे 1 कोटी 12 लाख 36 हजार रूपयांची रोकड लुटण्यात आली होती. हि रोकड लुटताना आपण पोलीस आहोत आणि तुम्ही दोन नंबरचा व्यवसाय करता असे धमकाऊन सुमारे 1 कोटी 12 लाख 36 हजार रुपयांची रोकड आणि ऐवज लुटून नेला होता.

आरोपींनी फिर्यादी आणि अन्य लोकांकडे असलेली रोख रक्कम व मेटल पार्सल असा ऐवज घेऊन सोलापुर-पुणे हायवे रोडलगतचे सर्विस रोडवर फिर्यादी व इतर व्यक्तींना हाताने व काठीने मारहाण करून व आणखी मारहाण करण्याचा धाक दाखवुन चोरून नेला होता.

पोलिसांनी सदर इसमांमधील एकाचे रेखा चित्र प्रसिद्ध केले असून त्यास आपण ओळखत असल्यास यवत पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

तसेच यातील अन्य संशयित इसमांपैकी एक इसम शरीराने धिप्पाड, उंच, रंगाने काळा, नाक सरळ, चेहरा उभा, डोळे मोठे, अंगामध्ये काळे रंगाचे जर्किंन, खाकी पॅंन्ट व हातात फायबरची लाठी असलेला. दुसरा इसम मध्यम शरीर यष्टी, अंगावर खाकी रंगाची कपडे असलेला कमी उंचीचा. तिसरा इसम मध्यम उंचीचा गोल चेहरा असलेला व चौथा इसम हा मध्यम शरीर बांधा अशा  वर्णाचा आहे.

वरील इसमाची मिळाल्यास यवत पोलीस ठाण्याचे पो.नि. भाऊसाहेब पाटील यांना संपर्क साधावा.