औरंगाबाद हादरले : औरंगाबादच्या पैठण तालुक्यात एका गावावर दरोडेखोरांचा हल्ला, दोन महिलांवर बलात्कार

औरंगाबाद :
संपूर्ण राज्याला चीड निर्माण करणारी भयंकर घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडली असून येथील एका गावावर दरोडेखोरांनी हल्ला करत दोन महिलांवर पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काल मध्यरात्री औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असणाऱ्या एका गावामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने काही दरोडेखोरांनी तेथील एका वस्तीवर हल्ला केला होता. या हल्ल्यावेळी एका घरात असणाऱ्या दोन महिलांवर या नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची भयानक घटना समोर आली आहे. सध्या या गावातील घटना घडलेल्या ठिकाणी औरंगाबाद चे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पीडित महिलांना रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.