लढवय्या मराठा नेता हरपला, शांताराम कुंजीर यांचे निधन




पुणे : सहकारनामा ऑनलाईन – 

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी लढणारा आणि स्वतःला सामाजिक कामामध्ये झोकून देणारा लढवय्या नेता शांताराम कुंजीर यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते मराठा क्रांती मोर्चा, किसान क्रांतीचे राज्य समन्वयक होते. ते संभाजी ब्रिगेडमध्येही कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मंगळवारी पहाटे त्यांना ह्दयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. उमेदीच्या काळात त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचेही काम केले होते. ग्रामीण भागामध्ये आर्थिक अडचणीत असलेल्या मराठा समाज आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी ते कायम झटत राहिले.