पुणे : सहकारनामा ऑनलाईन
पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे आज गुरुवार दि.7 मे रोजी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.
त्यांनी 2019 साली पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली होती. या बदलीला त्यांचा विरोध होता त्यामुळे त्यांनी याविरोधात मॅटमध्ये धाव घेत आपल्या बदलीला स्थगिती मिळविली होती. त्यामुळे ते अप्पर जिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळत होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्यांच्या निधनाबद्दल मोठ्या प्रमाणावर दुःख व्यक्त केले जात आहे.