मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळात आमदारकीची शपथ घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत निवडून आलेल्या इतर आठ बिनविरोध उमेदवारांनीही शपथ घेतली. सोशल डिस्टनसिंगचे पालन करत कुठलाही बडेजावपणा न करता हा शपथविधी पार पडला. या शपथविधीसाठी राज्याचे अनेक नेते उपस्थित होते. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक झाली होती त्यामध्ये चौघांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह सर्व नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह नीलम गोऱ्हे हे शिवसेनेकडून तर भाजपच्या वतीने गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी व काँग्रेसकडून राजेश राठोड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड होऊन त्यांनी आमदारकीची शपथ घेतली