शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनला अपघात, एक पोलीस अधिकाऱ्यासह दोनजन जखमी



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाल्याची घटना  आज सकाळी अमृतांजन पुलाखाली घडली आहे. या अपघातामध्ये संपूर्ण वाहन उलटले त्यामुळे यातील दोनजन जखमी झाले मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

पवार आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबईकडे निघाले होते. तेव्हा त्यांच्या वाहन ताफ्यातील वाहनाचा हा अपघात झाला आहे. यावेळी पवारांनी स्वतः या जखमींची विचारपूस करून जखमींना दवाखान्यात घेऊन जाण्याच्या सुचना दिल्या.

पवारांच्या ताफ्यातील वाहन हे पोलीस व्हॅन असून ती अचानक उलटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये या व्हॅन चा वाहनचालक आणि एक अधिकारी जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली.