केडगावकरांच्या चिंता अधिक वाढल्या, ‛केडगावमध्ये पुन्हा दोघेजण ‛कोरोना पॉझिटिव्ह’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगावमध्ये पुन्हा दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने केडगावकरांच्या चिंता वाढल्या आहेत. 

सापडलेल्या रुग्णांमध्ये केडगाव स्टेशनमधील एका महिलेचा समावेश असून दुसरा रुग्ण 22 फाटा येथील असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच केडगावमध्ये तब्बल 10 जण पॉझिटिव्ह सापडले होते त्यामुळे संपूर्ण केडगाव बंद ठेवण्यात आले होते. आता यातील काही रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतत असतानाच पुन्हा केडगावमध्ये दोघेजण कोरोना बाधित असल्याचे समोर आल्याने केडगावकारांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. केडगावमध्ये दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे आणि यवत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.इरवाडकर यांनी ‛सहकारनामा’ला दिली आहे.