पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची तब्येत मात्र चांगली असल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले आहे.

पुढे लिहिताना त्यांनी मी उपचार घेऊन लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असे म्हटले आहे. कोरोना वाढत असतानाही त्यांच्यावर पुण्याची जबाबदारी असल्याने ते समाजकामात व्यस्त होते. य  कोरोना फैलावत असताना ते अनेक रुग्णालयांशी बोलणी करून त्यांच्याशी उपचारांचे करारनामे करत होते, तसेच ते पुण्यातील कोरोनाग्रस्त भाग आणि कंटेन्मेंट भागाची पाहणी करून उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेत त्यावर उपाययोजना राबवत होते.