दौंड : सहकारनामा ऑनलाईन
काल दौंड शहरातील 93 जणांची कोरोना टेस्ट केल्यानंतर यामध्ये 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.डांगे यांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये 8 जण दौंड शहरातील असून 1 जण हा सोनवडी या गावचा असल्याचे समोर आले आहे. दौंड शहर आणि तालुका दिवसेंदिवस कोरोनाच्या विळख्यात सापडत चालला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास यावर सहज मात करता येणार आहे मात्र त्यासाठी नागरिकांनी सय्यम ठेऊन घराबाहेर शक्यतो पडू नये आणि घराबाहेर पडायचे असल्यास तोंडाला मास्क लावावा, सॅनिटायझरचा योग्य वापर करावा तसेच गर्दीपासून दूर राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.