केडगाव, यवत, खोर, पाटस आणि पारगाव येथील 22 जणांपैकी 21 जण निगेटिव्ह मात्र ‛या’ गावातील 1 जण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील  केडगाव, खोर, यवत, पाटस, पारगाव या गावांतील सुमारे 22 जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली त्या पैकी 21 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत तर खोर या गावातील 1 जण पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे. 

खोर मधील कोरोना बाधित असलेली व्यक्ती नोकरी करत असल्याचे समोर येत असून त्याची कोरोना हिस्ट्री मात्र समजू शकली नाही. याबाबत नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, मास्क परिधान करूनच बाहेर पडावे, साबण आणि सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.