BREAKING NEWS LockDown पुणे जिल्ह्यात पुन्हा ‛कडक लॉकडाऊन’, अजित पवारांची मोठी घोषणा



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले आहेत.

आता सोमवार दि.13 जुलैपासून पुढील 15 दिवसांपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. याबाबत काही कालावधीत याची सविस्तर माहिती आणि अटी, शर्ती जाहीर केल्या जाणार आहेत. (Pune Lockdown again) पालकमंत्री अजितदादा  पवारांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा करताना यामध्ये पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडचाही समावेश करण्यात आला आहे. सोमवार दि. 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात पुढील 15 दिवस  पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येणार असून येईल. या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता.