वरवंड, खोर येथील 9’जण निगेटिव्ह तर बोरीपार्धी मधील 1’जण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील यवत ग्रामीण रुग्णालयाच्या हद्दीमधील 9 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती ते सर्वजण निगेटिव्ह आले असून प्रायव्हेट लॅबमध्ये चाचणी करण्यात आलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे आणि यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरवंड आणि खोर येथील 9 जणांची कोरोना टेस्ट ही सरकारी लॅबमध्ये करण्यात आली होती त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले तर बोरीपार्धी येथील   एका गृहस्ताची कोरोना टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत आता बोरीपार्धीमध्ये नियम कडक करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.