पुणे : सहकारनामा ऑनलाईन
पुणे शहरातील येरवडा कारागृहातून पळून गलेल्या आरोपींपैकी दुसऱ्या आरोपीला पकडण्यातही पोलिसांना यश आले आहे.
सनी पिंटो (वय 25 थेरगांव, पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.
येरवडा कारागृहातून गुरुवारी दि.16 रोजी आरोपी कैदी खिडकीचे गज तोडून पळून गेले होते. यापैकी एका कैद्याला दौंडमध्ये पोलिसांनी अटक केली होती.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच आरोपींपैकी सनी हा येरवडा तुरूंगात असताना त्याच्यासह पाच जणांनी येरवडा तुरूंगाच्या खिडकीचे गज तोडुन पोबारा केला होता. या कैद्यांचा शोध घेत असताना आरोपी सनी पिंटो हा थेरगावच्या केजूदेवी जवळ येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रशांत गिलबिले यांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शिताफीने सनी पिंटोला अटक करत पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हि कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरिक्षक हरिष माने पोलीस कर्मचारी प्रशांत गिलबिले, बाबाजान इनामदार, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, विक्रम जगदाळे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, सचिन नरुटे, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, दिपक भोसले, शाम बाबा, तात्या शिंदे यांच्या पोलीस पथकाने केली.