पुणे : सहकारनामा ऑनलाईन
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या तब्येतीबाबत उलट सुलट माहिती पुढे येत होती. मात्र या उलट सुलट चर्चांना आता खुद्द रुपाली चाकणकर यांनीच ब्रेक लावला असून त्यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून आपल्या तब्येतीबाबत वस्तुस्थिती मांडली आहे.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर माहिती टाकताना
“गेले दहा दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते,
दोन दिवसांपासून प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रूबी हॉल क्लिनिक, पुणे येथे उपचार घेत आहे, सध्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मी आपल्या सर्वांचे प्रेम व काळजी समजू शकते. लवकरच आजारातून बाहेर पडेल”
असा मेसेज आपल्या सर्व कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत ज्या उलट सुलट बातम्या पसरवल्या जात होत्या त्यांना कुठेतरी लगाम बसला आहे.