पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

 पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

अन्नधान्य पुरवठा बाबत माहिती देताना त्यांनी या विभागात  अंदाजे  2 हजार 292  क्विंटल अन्नधान्याची,  18  हजार 999  क्विंटल  भाजीपाल्याची,  3  हजार 383  क्विंटल फळांची तर  कांदा ,बटाट्याची 24 हजार 988   क्विंटल इतकी आवक झाली आहे असल्याचे सांगितले.

पुणे विभागात 19 जुलै  2020  रोजी 95.51  लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 25.42  लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.            

( टिप : – ही आकडेवारी दुपारी 12.00 वा. पर्यंतची आहे )