दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील स्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे.
आज दि.20 जुलै रोजी ग्रामीण भागामध्ये एकूण 28 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची धक्कादायक माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार कासुर्डीमध्ये 17, बोरिभडक 4, पाटस 3, राजेगाव 1, वाटालूज 1, सहजपुर 1 असे एकूण 28 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
प्रशासन कोरोना बधितांचा आकडा कमी करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी नागरिकांनी नियम पाळले तरच हा व्हायरस रोखण्यात मदत होणार आहे.
कोरोना बाधितांची संख्या या परिसरात घटली तरच ग्रामीण भागातील लॉक डाउन कमी होणार आहे, अन्यथा पुन्हा एकदा दौंड शहरासारखे कडक लॉकडाऊन ग्रामीण भागातही होऊन दौंडकरांना कठोर लोकडाऊन ला सामोरे जावे लागेल यात शंका नाही.