Crime : लोणीकंद पोलिसांकडून अवघ्या दोन दिवसात ‛खुनाचा उलगडा’



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी) 

लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत वाघोली येथे दोन दिवसापूर्वी एका बिगारी कामगाराचा अनोळखी व्यक्तीकडून दगडाने ठेचून खून केला होता.कोणतेही ठोस पुरावे नसताना लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाने याचा तपास केवळ छत्तीस तासात लावला असून या प्रकरणी दोघांना गजाआड केले आहे. 

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोली येथील चोखीदानी रोडवर असलेल्या मोकळ्या जागेत दोन दिवसापूर्वी एका बिगारी कामगाराचा अज्ञात व्यक्तीकडून दगडाने ठेचून खून झाला होता.यावर लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी घटनेचे गांभीर्य ध्यानात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हनमंत पडळकर पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे पोलिस नाईक श्रीमंत होनमाणे पोलिस काॅन्स्टेबल संतोष मारकड दत्तात्रय काळे समीर पिलाने ॠषीकेश व्यवहारे सुरज वळेकर यांना तत्परतेने हरकत घेऊन तपासाचे आदेश दिले. 

या तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले त्यात त्यांना एक जेवनाचा डबा एक एटीएम कार्ड पाकीट व त्यात एक पासपोर्ट साईज फोटो सापडला. यावरुन त्यांनी पोस्टर्स तयार करुन जागोजागी लावले तसेच सोशल मिडियावर प्रसारित केले त्यावर मयताची पत्नी व मेव्हणा पोलिस स्टेशनला पोहोचले.त्यांनी ओळख पटवली व मयत दत्ता लक्ष्मण बंडगर रा.वाघेश्वर नगर गोरेवस्ती वाघोली असे असल्याचे सांगितले. 

तपास करत असताना घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी वाघोली आव्हाळवाडी चंदननगर खराडी कोरेगाव या ठिकाणी तपास केला परंतु काहीही धागादोरा लागेना दरम्यान वाघोली येथे पहाटे वाघेश्वर मंदीराशेजारी एक संशयीत व्यक्ती सागर कैलास पवार आढळून आली त्याच्याकडे अधीक तपास केला असता सर्व माहिती पुढे आली.त्याने दारुच्या नशेत त्याचा मित्र बालाजी किसन गोरे याच्या मदतीने दगडाने ठेचून खून केला असल्याचे सांगितले. 

      पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.