दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील उंडवडी येथे एका तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. हा तरुण सहजपुर येथील कंपनीत कामाला आहे. या कंपनीत काम करणाऱ्या काही तरुणांचे कोरोना रिपार्ट या अगोदर पॉझिटिव्ह आले होते.
सोमवारी या तरुणाचेही स्वॅब लॅबमध्ये पाठविल्यानंतर आज त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती राहू येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पांढरे यांनी दिली.
कोरोनाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य सेवकांकडून करण्यात येत आहे.