पुणे : सहकारनामा ऑनलाईन
राज्यसभेमध्ये शपथ घेताना जो काही प्रकार झाला आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचे काहूर माजले आहे, मात्र याबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे.
यामध्ये त्यांनी सभागृहात असे काही घडलेले नाही असे सांगत जर शिवरायांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता असे विधान केले आहे.
राज्यात राजकीय पातळीवर याचे जास्त पडसाद उमटू लागल्याने उदयनराजे भोसले यांनी महाराजांच्या नावाने कुणी राजकारण करू नये, जे झाले नाही त्याचा वेगळा अर्थ काढू नका असे विनम्र आवाहनही त्यांनी केले आहे.
काल सातारा चे मा.खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यावेळी जय हिंद, जय महाराष्ट्र नंतर जय शिवाजी, जय भवानी असा जयघोष केला. त्यावेळी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी या पुढील जय घोष हे रेकॉर्डमध्ये घेऊ नये, ते काढून टाकावे असा तेथे आदेश देत याबाबत उदयनराजे यांना आणि तेथील उपस्थित मेम्बरांना कोणतेही स्लोगन वापरू नये असे सांगितले.
यावेळी अध्यक्ष व्यंकय्या नायडूंनी हे मे चेंबर आहे, कुणाचं घर नाही या चेंबरचा मी अध्यक्ष आहे. असे सांगितले.