Corona : पुणे विभागातील 43 हजार 430 कोरोना बाधित रुग्ण ‛बरे होऊन’ घरी परतले, मात्र अजूनही विभागात ‛कोरोना’ बाधित इतके रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

 पुणे विभागातील 43 हजार 430  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, मात्र अजूनही विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 75 हजार 288 इतकी आहे. सध्या ॲक्टीव रुग्ण 29 हजार 732 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 126 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 815 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.69 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.82  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्हयातील  61 हजार 944 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 37  हजार 323 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 100 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 11 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 991 व पुणे कॅन्टोंन्मेंट 232, खडकी विभागातील 43, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 717, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  106  रुग्णांचा समावेश आहे. 

पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 99, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 254 व पुणे कॅन्टोंन्मेंट 30, खडकी विभागातील 27, ग्रामीण क्षेत्रातील 73, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  38 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 572 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.25 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.46  टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 587 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 917, सातारा जिल्ह्यात 123, सोलापूर जिल्ह्यात 198, सांगली जिल्ह्यात  79 तर कोल्हापूर जिल्ह्यात 270 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2  हजार 753  रुग्ण असून 1  हजार 495  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 165 आहे. कोरोनाबाधित एकूण 93  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 6 हजार 327 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 70  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  2  हजार 857  आहे. कोरोना बाधित एकूण 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 182 रुग्ण असून 459 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 681 आहे. कोरोना बाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 3 हजार 82 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 83  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 929 आहे. कोरोना बाधित एकूण 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 3 लाख  68 हजार  768  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी   3 लाख 64 हजार 319 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 449 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 88 हजार 258 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. तर 75 हजार 288 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.          

( टिप :- दि. 23 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)