दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
आता दररोज कोणत्या न कोणत्या गावात रुग्ण सापडत आहेत.
काल 19 रुग्ण यवत ग्रामिण रुग्णालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या गावांमध्ये सापडले होते, आज पुन्हा या रुग्णालयाच्या अखत्यारीतील गावांमध्ये 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिलेल्या माहितीनुसार बोरीपार्धी 1 (महिला), खुटबाव 1 (पुरुष), ताम्हणवाडी 1 (पुरुष), उंडवडी 1 (महिला), जावजीबुवाची वाडी 1 (पुरुष) असे पाच रुग्ण पुन्हा सापडले आहेत. दौंडमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे.