दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील कानगाव, नानगाव, खुटबाव आणि ताम्हाणवाडी या चार गावांना कोरोना व्हायरसने पुन्हा ‛झटका’ दिला आहे. या चार गावांमध्ये 8 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
60 जणांचे स्वॅब पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. या 60 जनांपैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.
कानगाव 2, नानगाव 1, खुटबाव 1 आणि ताम्हाणवाडी 4, अशी बाधा झालेल्या रुग्णांची गाव निहाय आकडेवारी आहे.
दौंड तालुक्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच असून तो थांबायचे नाव घेताना दिसत नाही. तालुक्यामध्ये अनेक गावांना कोरोनाने आपले शिकार केले आहे.
दररोज कोणते न कोणते गाव कोरोनाला बळी पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच सोशल डिस्टन्स पाळून आपला बचाव करण्याची गरज आहे