दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड शहरवासीयांसाठी आज दिलासादायक बातमी असून उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 28 जुलै रोजी एकुण 51 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती.
त्याचा रिपोर्ट आता प्राप्त झाला असून
त्या 51 नागरिकांपैकी पैकी 50 रुग्णाचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.
याबाबतची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.
फक्त एक जणाचा स्वॅब हा पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेला 46 वर्षीय पुरुष हा पाटील चौक येथील रहिवासी आहे.