दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील खुटबाव जवळ कॅनॉल लगत असणाऱ्या एका वस्तीजवळ दोघांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेमध्ये एका महिला आणि एका पुरुष असा दोघांचा खून करण्यात आला आहे. हे दोन्ही खून महिलेच्या पतीने केले असल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
खुनाची माहिती मिळताच दौंड च्या पोलीस उपविभागीय अधिकारी DYSP ऐश्वर्या शर्मा, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहा.पोनी. धनंजय कापरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. हे दुहेरी हत्याकांड अनैतिक संबंधांतून झाले की अजून कोणत्या करणातून याची माहिती पोलीस घेत आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात प्रसिद्ध करत आहोत.