दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण आजही हवे तसे आटोक्यात आलेले दिसत नाही. दौंड शहर असो की ग्रामीण दररोज कुठे न कुठे कोरोनाचे रुग्ण सापडतच असल्याने अजूनही दौंडकरांची कोरोनापासून सुटका झालेली नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आज दि. 4 ऑगस्ट रोजी यवत ग्रामीण रुग्णालय व स्वामी चिंचोली कोविड सेन्टरकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण 45 जणांचे स्वॅब टेस्ट प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार खुटबाव 1, पारगाव 1, कुरकुंभ 2 आणि वासुंदे 5 अशी पॉझिटिव्ह रुग्णांची गाव निहाय आकडेवारी आहे.