Corona – दौंड ग्रामिणमध्ये 47 पैकी 1 पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोनाचा जोर कमी होत असल्याचे दिसत आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार 47 पैकी फक्त एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह आलेली 53 वर्षीय ही व्यक्ती राहू ता.दौंड येथील रहिवासी आहे.

काही दिवसांत आलेल्या अहवालांवरून दौंड तालुक्यात कोरोनाची साखळी तुटण्यात यश येत असल्याचे समोर येत आहे. नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.