National News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिलासा



नवी दिल्ली :

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. ते आता करोनामुक्त झाले असल्याचे त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 

राम जन्मभूमी भूमिपूजन समारंभाच्या अगोदर त्यांनी कोरोना टेस्ट केली होती त्यामध्ये ते पॉझिटीव्ह आले होते. यानंतर त्यांच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांची पुन्हा टेस्ट केल्यानंतर ते निगेटिव्ह असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. परंतु ते पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाइन होणार असल्याचे स्वतः शाह यांनी सांगितले आहे.

5 तारखेला राम जन्मभूमी कार्यक्रम होणार होता, मात्र अमित शाह यांना 2 ऑगस्ट रोजीच करोनाची बाधा झाल्याने त्यांना तो कार्यक्रम सोडावा लागला होता. अमित शाह यांनीच स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती.