दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरात कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चिन्ह दिसत असतानाच कोरोनाने शहर व परिसरात पुन्हा डोकं वर काढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
आज शहरात नव्याने सात रुग्णांची भर पडली असून एक रुग्ण ग्रामीण भागात आढळून आला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाने दिनांक 19 ऑगस्ट रोजी शहर व परिसरातील 71 संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. आज रोजी त्यांचा अहवाल प्राप्त झाला. अहवालानुसार 71 पैकी 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
३०-६० वर्ष वयोगटातील ४ पुरुष व ४महिलांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील भीम नगर-२, कुंभार गल्ली,नेहरू चौक, पानसरे वस्ती, सावरकर नगर, जनता कॉलनी तसेच गोपाळवाडी परिसरातील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.