दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्याला कोरोनाचे लागलेले ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा हा वाढतच चाललेला दिसत आहे.
यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण 110 जणांची चाचणी करण्यात आली होती त्या पैकी 65 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 17 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
24 तारखेला या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 65 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत, प्राप्त अहवालांमध्ये केडगाव 4, डाळिंब 5, चंदनवाडी 4, कडेठाण 2, पाटस 1, वाळकी 1 अशी गाव निहाय आकडेवारी समोर आली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 6 वर्षीय चिमुकल्यांपासून ते 67 वर्षणपर्यंतच्या वृद्धाचाही समावेश असून यामध्ये 9 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे.