दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यामध्ये ग्रामीण भाग सध्या कोरोनाच्या हिटलिस्टवर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आज यवत कोविड सेंटरमधून आलेल्या अहवालानुसार 74 पैकी सुमारे 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 2 जणांचे अहवाल अजून पेंडिंग आहेत याबाबतची माहिती यवत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये यवत 8, बोरीऐंदी 5, बोरीपार्धी 2, कासुर्डी 3, वरवंड 1, देवकरवाडी 2, लडकतवाडी 2, सहजपुर 1, देऊळगाव गाडा 1, डुबेवाडी 1 अशी गाव निहाय आकडेवारी आहे.
सर्व रुग्ण 14 ते 72 वयोगटातील असून यात 14 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे.