दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या 40 जणांच्या चाचणीमध्ये 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे, याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली आहे.
स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरचे हे अहवाल असून अजून यवत आणि दौंड शहराचे अहवाल येणे बाकी आहे.
प्राप्त झालेल्या अहवालानुसार पाटस 7, कुरकुंभ 1, रावणगाव 3, केडगाव 1 असे 12 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये 12 वर्षांच्या मुलासह 74 वर्षे वयापर्यंत रुग्णांचा समावेश आहे.