दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगावमध्ये एका 36 वर्षीय मुलीने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना समोर आली आहे. जवळपास 8 दिवसांपूर्वी या मुलीने राहत्या घरात आत्महत्या केल्याचे समजत असून घरातून उग्र वास सुटल्याने नागरिकांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला आहे.
मयत मुलीचे नाव ज्योती मधुकर वाघमारे असे या 36 वर्षीय मुलीचे नाव असून तिने घरामध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती केडगावचे पो.ह.मंगेश कदम यांनी दिली आहे.
ज्योती वाघमारे ही केडगाव येथील पंचरत्न सोयासायटी येथे रहायला होती. तिच्या आईचे निधन झाल्यानंतर ती मानसिक रित्या खचून गेली असल्याचे व त्यातून तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास पो.ह.मंगेश कदम करत आहेत.