कोरोनामुळे पुण्यातील पत्रकाराचे निधन



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुण्यातील एका वृत्तवाहीनीचे रिपोर्टर (प्रतिनिधी ) पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मीडिया आणि वृत्तपत्र जगतातील सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे.

त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच शासनाने त्यांच्या परिवाराला त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी पत्रकार संघातर्फे करण्यात येत आहे.