पुणे : सहकारनामा ऑनलाईन
अभिनेत्री कंगना राणावत हि राणी लक्ष्मीबाई यांचा अवतार असल्याचे भाजप आमदार राम कदम यांनी विधान केल्याने त्यांचा आज पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे बालगंधर्व चौक राणी लक्ष्मीबाई स्मारक येथे निषेध करून आंदोलन करण्यात आले.
कंगना राणावत ह्या राणी लक्ष्मीबाई यांच्या अवतार असल्याचे वादग्रस्त विधान भाजप आमदार राम कदम यांनी काल केले होते. त्यांच्या या विधाना विरोधात आक्रमक होऊन पुणे शहर युवक कॉंग्रेस तर्फे राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकला पुष्पहार घालून राम कदम व भाजप नेत्यांचा निषेध करण्यात आला.
भाजप आमदार राम कदम यांनी वादग्रस्त विधान करून थोर क्रांतिकारी राणी लक्ष्मीबाई यांचा अपमान केल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे असून या विधानाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आज आंदोलन करून राम कदम यांन यांनी जर या विधानावर माफी मागितली नाही तर युवक काँग्रेस त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.” असा इशारा दिला.
भाजप नेत्यांनी ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राणी लक्ष्मीबाई पर्यंत महापुरुषांना बदनाम करण्याचे सत्र चालवले आहे त्यांच्या विरोधात युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस आता अजून आक्रमक होत राहील, कारण यामुळे येणाऱ्या पिढी मध्ये महापुरुष बद्दल संभ्रम निर्माण होत आहे जे आम्ही कदापि होऊ देणार नाही ” असे यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या आंदोलनावेळी पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, संकेत गलांडे, पुणे शहर सरचिटणीस विवीयन केदारी, पुणे शहर सरचिटणीस कुणाल काळे, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अभिजीत रोकडे, आसिफ खान व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.