Corona : कोरोना रुग्णांच्या या सुविधेबाबत आमदार कुल यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे हि महत्वाची मागणी



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

राज्यातील रुग्णांचे ऑक्सिजन अभावी हाल होत असून उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजन  सिलेंडरची टंचाई दूर करण्याची मागणी दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.

संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस कोरोना (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच काळात रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.ऑक्सिजन बेडची वेळेत उपलब्धता न झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत असून, यामुळे रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोरोना (कोव्हीड १९) च्या कालावधीत रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर टंचाई कमी करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब, विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे मा. अजितदादा पवार साहेब व जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे आमदार राहुल कुल यांनी केली.