आज पुन्हा केडगाव, यवतसह ‛या’ 6 गावांमध्ये ‛11’ जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव, यवत, सहजपुर, बोरीऐंदी, नागरगाव, भांडगाव या सहा गावांमध्ये आज 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले अशी माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार एकूण 111 जणांचे स्वॅब घेऊन ते पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये केडगाव 3, यवत 2, सहजपुर 2, (सहकारनामा न्यूज) बोरीऐंदी 2, नागरगाव 1, आणि भांडगाव 1 अशी गावनिहाय आकडेवारी प्राप्त झाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेले सर्व रुग्ण हे 17 ते 68 या वयोगटातील असून यामध्ये 8 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. दौंड तालुक्यामध्ये विविध उपाय योजना अंमलात आणूनही अजूनही कोरोनावर मात करता आली नाही. उलट दिवसेंदिवस विविध गावांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने निश्चितच दौंडकरांच्या चिंता वाढल्या आहेत.