दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
यवत ग्रामिण रुग्णालयाकडून दिनांक 11 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या स्वॅब टेस्टमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने दौंड ग्रामीणला झटका दिला असल्याचे समोर आले असून यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांकडून प्राप्त अहवालानुसार 7 गावांतील तब्बल 18 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोना रुग्ण सापडलेल्या गावांमध्ये केडगाव 6, यवत 5, राहू 2, कासुर्डी 2, बोरीपार्धी 1, पडवी 1, बोरीभडक 1, असे एकूण 18 कोरोना रुग्ण या 7 गावांमध्ये सापडल्याने या गावांच्या चिंता वाढल्या आहेत.
दि.11 सप्टेंबर रोजी एकूण 94 लोकांचे स्वॅब टेस्टसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 14 पुरुष आणि 4 महिला असे एकूण 18 जण पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह रुग्णांचे वय हे 16 ते 63 दरम्यान आहे.